दाऊदच्या नातलगाकडील विवाहास पोलिसांची हजेरी

By Admin | Updated: May 23, 2017 03:21 IST2017-05-23T03:21:26+5:302017-05-23T03:21:26+5:30

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेसंबंधातील शाही विवाह सोहळ्यास पोलीस अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता त्यांच्यामागे

David's wife's marriage attendance | दाऊदच्या नातलगाकडील विवाहास पोलिसांची हजेरी

दाऊदच्या नातलगाकडील विवाहास पोलिसांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेसंबंधातील शाही विवाह सोहळ्यास पोलीस अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सोशल मिडियावर यासंदर्भात एक संदेश प्रसारीत झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नाशकातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कुटुंबियाकडे नुकताच विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यास देशभरातील बुकींसह, गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्तांसह सुमारे वीसहून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावल्याची माहिती समाजमाध्यतून पुढे आली. त्याची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे़ या सोहळ्यास दाऊदच्या परिवारातील काही सदस्यांसह देशभरातील राजकीय व प्रतिष्ठीत व्यक्तींनीही हजेरी लावली होती. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राथमिक स्तरावरील जबाब घेतले जात असून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे़ वरिष्ठांच्या सूचनेनुसार या अहवालानंतर संबंधितांवर कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़

Web Title: David's wife's marriage attendance