विरोधक पसरवताहेत भाजपा संविधान बदलवणार असल्याच्या अफवा, मुख्यमंत्र्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:59 IST2019-01-20T13:58:13+5:302019-01-20T13:59:53+5:30
विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे.

विरोधक पसरवताहेत भाजपा संविधान बदलवणार असल्याच्या अफवा, मुख्यमंत्र्यांची टीका
नागपूर - विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीच बदलू शकत नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेससह अन्य विरोधकांवर जोरदार टीका केली.
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.''भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीच बदलू शकत नाही. बाबासाहेबानी दिलेल्या संविधानाची रक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता . काँग्रेसने केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग केला. त्यांच्या कथनी व करणीमध्ये अंतर होते. आम्ही बोलतो कमी, काम जास्त करतो. भाजपच्या 10 वर्षांच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा जास्त काम झाले. काँग्रेसने केवळ काही नेत्यांनाच मोठे केले. बाबासाहेबांचे नाव घेण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.
लाइव : भाजपा अनुसूचित जाति मोर्चा के भीम विजय संकल्प राष्ट्रीय अधिवेशन का समापन समारोह। #BhimVijaySankalphttps://t.co/0lxXOqTPhr
— BJP (@BJP4India) January 20, 2019
डॉ बाबा साहेब अंबेडकर जी के संविधान की रक्षा भारतीय जनता पार्टी की प्राथमिकता है : श्री @Dev_Fadnavis#BhimVijaySankalphttps://t.co/zLw31esdXWpic.twitter.com/S3pMVVTTYh
— BJP LIVE (@BJPLive) January 20, 2019