बालकांच्या लैंगिक छळाचा विकार बळावतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:17 PM2019-04-09T19:17:21+5:302019-04-09T19:20:43+5:30

पिडोफील व्यक्तींमध्ये तारुण्यसुलभ व्यक्तिमत्व नसणा-या बालिकांवर केवळ कामतृप्तीच्या आकांक्षेपोटी बाल-बलात्कार घडतात.

Child sexual harassment disease increasing ? | बालकांच्या लैंगिक छळाचा विकार बळावतोय?

बालकांच्या लैंगिक छळाचा विकार बळावतोय?

Next

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : चार वर्षांची इरा (नाव बदलले आहे) बिल्डिंगमध्ये खेळत असताना बिल्डिंगमधला भूषण दादा तिला कोप-यात घेऊन गेला. तिला मांडीवर बसवून विचित्र स्पर्श करु लागला. त्याच्या तावडीतून सुटका करुन घेत तिने तातडीने घरी धाव घेतली आणि आईला ही गोष्ट सांगितली. पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली, दादाला बोलावून घेण्यात आले. आपल्या कृतीने तो खूप वरमला होता. त्याचे पालकही पोलीस स्टेशनला पोहोचले. दादाला ‘पिडोफिलिया’ झाल्याची बाब त्यांनी पोलिसांच्या कानावर घातली. यात दोष कोणाचा होता, दादाचा की त्याला झालेल्या मनोलैंगिक विकाराचा? काय आहे नेमका पिडोफिलिया?
    एका अमेरिकन संशोधनानुसार, २४२९ बाललैंगिक गुन्हयांमधील पुरुष गुन्हेगारांमध्ये स्वभाव: तपिडोफिलचे प्रमाण केवळ ७ टक्के आहे. अतिमानसिक ताण, विस्कळीत वैवाहिक जीवन आणि कामोत्तेजनेच्या प्रसंगी जोडीदार न मिळणे अशी पिडोफिलियाची लक्षणे आहेत. अमेरिकेतील मेथो क्लिनिकच्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला की, स्वभावत: पिडोफील गुन्हेगार जास्त वेळा असा लैंगिक अत्याचार करतात. 
    ‘लोकमत’शी बोलताना क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शशांक सामक म्हणाले, ‘व्हिएन्नाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. क्राफ्ट एबिंग यांनी १८८६ मध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा पिडोफिलिया इरॉटिका हा शब्द वापरला. अकरा वर्षांच्या आतील बालकांवर होणारा लैंगिक अत्याचार याला वैद्यकीय भाषेत पिडोफिलिया असे म्हटले जाते. पाच वर्षांच्या आतील शिशुंवर होणा-या लैंगिक अत्याचाराला ‘इन्फंटोफिलिया’ तर अकरा ते तेरा वयोगटांतील बालकांवर होणा-या लैंगिक अत्याचाराला ‘हेबीफिलिया’ म्हटले जाते. पुरुषांकडून असे गुन्हे घडत असले तरी स्त्रीकडूनही असे लैंगिक अत्याचार घडू शकतात.’
    पिडोफील व्यक्तींमध्ये तारुण्यसुलभ व्यक्तिमत्व नसणा-या बालिकांवर केवळ कामतृप्तीच्या आकांक्षेपोटी बाल-बलात्कार घडतात. वैद्यकीय व्याख्येमध्ये अशी क्रियाच नव्हे, तर प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार न करता सातत्याने तसा विचार करण्याची, सेक्शुअल फँटसीची आणि बाललैंगिकतेच्या फिल्म पाहण्याची प्रवृत्तीही ‘पिडोफिलिया’ प्रकारात गणली जाते. प्रत्येक पिडोफील हा लैंगिक गुन्हेगारी करेलच असे नाही. मात्र, लैंगिक गुन्हेगारी करणारी व्यक्ती पिडोफील असू शकते. 
पिडोफिलिक व्यक्तींना समुपदेशन, बिव्हेरियल थेरपी देऊन त्यांना लैंगिक गुन्'ांपासून परावृत्त करता येऊ शकते. कॅनडियन सेक्सॉलॉजिस्ट मायकेल सेटो याने अशी थेरपी उपयुक्त ठरण्यासाठी बाललैंगिक कामस्वप्नांपासून परावृत्त करणारे स्वकामपूर्तीचाही उपाय सांगितला आहे. मानसिक ताण हाताळायला शिकवणे, वैवाहिक जीवनातील लैंगिकता समाधानकारक करणे अशा मार्गदर्शनातून विकाराचा सामना करता येऊ शकतो. 
----------    
कामभावनेचा उद्रेक कसा हाताळावा, याची व्यक्तिगत आणि सामाजिक जाणीव नसणे हा लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा परिपाक आहे. लैंगिक मनोविकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. लैंगिकतेचे नागरिकशास्त्र शालेय जीवनापासून, पौंगडावस्थेत आणि विवाहपूर्व काळातही टप्प्याटप्प्याने देणे आवश्यक असते. त्यामुळे निकोप लैंगिकतेचे सुजाण नागरिक निर्माण व्हायला हवेत.
- डॉ. शशांक सामक, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
---------------
पिडोफिलिया हा एक मनोलैंगिक विकार आहे. लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण (पिडोफिलीया) वाटणे स्वत: त्या व्यक्तीसाठी वेदनादायक/ तणावपूर्ण होऊ शकते. ज्या व्यक्तींना लहान मुलां-मुलींविषयी लैंगिक आकर्षण वाटते आणि ज्यांना स्वत:ला तपासून घ्यावे, असे वाटते त्यांच्यासाठी निनावी आणि गोपनीय मदत उपलब्ध आहे, अशा शब्दांत अभिनेत्री स्पृहा जोशीने फेसबूक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर पिडोफिलिया हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
...............
कायद्याचा बडगा
अर्थात मनोलैंगिक विकाराला कायद्याने सज्जड शिक्षेची तरतूद केली आहे. बालकांबरोबर लैंगिक गैरवर्तन करणाºयांना पॉक्सो कायद्याअंतर्गत कडक शिक्षेची नोंद केली आहे. तसेच या गुन्ह्यांचे गांभिर्य लक्षात घेऊन अशा गुन्ह्यांची नोंद झाल्यापासून चोवीस तासांच्या आत त्याची माहिती जिल्हा स्त्री आणि बाल विकास अधिकाºयाला कळवण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर घातले आहे.

Web Title: Child sexual harassment disease increasing ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.