भेसळयुक्त बियाण्यांची सीबीआय चौकशी - सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:56 IST2018-03-19T23:56:13+5:302018-03-19T23:56:13+5:30
बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तणनाशकाला सहनशील असणाऱ्या जनुकांचा (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापर करून बियाणे उत्पादक कंपन्या त्यांची व्रिक्री करत असल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्यशासनाच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत दिली.

भेसळयुक्त बियाण्यांची सीबीआय चौकशी - सदाभाऊ खोत
मुंबई : बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तणनाशकाला सहनशील असणाऱ्या जनुकांचा (हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापर करून बियाणे उत्पादक कंपन्या त्यांची व्रिक्री करत असल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्यशासनाच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत दिली. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारो राज्य शासन कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यासंदर्भात विराधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खोत यांनी सांगितले की,
बी.टी. कापसाच्या बियाण्यांमध्ये तणनाशकाला सहनशील असणा-या बियाणांची चाचणी महिको या बियाणे कंपनीकडून २००८ ते २०१० या कालावधीत केंद्र शासनाच्या जेनेटीक इंजिनियरींग अप्रायझल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली होती.
या कमिटीच्या सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत ५८.४० क्विंटल बियाण्यंचा साठा आढळून आला आहे. या संदर्भात सीबीआय आणि एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे.