युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:03 PM2019-01-03T16:03:39+5:302019-01-03T16:04:56+5:30

जागा वाटपाचा 'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात राबवणार नसल्याचं शहा म्हणाले.

BJP president Amit Shah took aggressive stand regarding alliance with Shiv sena in Maharashtra | युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

Next

नवी दिल्ली: शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही. युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या, कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, असं शहा म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शहांनी भाजपा खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी शहांनी युतीबद्दलची आपली भूमिका मोजक्या शब्दांमध्ये स्पष्टपणे मांडली. 

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक काल दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रात युती करायची असेल, तर काही गमावून का करायची? काही गमावून अजिबात युती अजिबात केली जाणार नाही, असं शहा म्हणाले. बिहारमध्ये भाजपानं मित्रपक्षांसाठी स्वत:च्या कोट्यातील काही जागा सोडल्या. त्यामुळे संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीला मोठा फायदा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनादेखील भाजपावर दबाव वाढवून अधिकच्या जागा पदरात पाडून घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही शक्यता शहांनी पूर्णपणे फेटाळून लावली. 

जी दया नितीश कुमार यांना दाखवली, ती शिवसेनेला दाखवली जाणार नाही, असं रोखठोक मत अमित शहांनी व्यक्त केलं. 'युतीसाठी शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट पाहू. मात्र त्यांच्यासमोर झुकणार नाही,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये लढण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहू, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी खासदारांना दिले. मतदारसंघात जा आणि मतदारांना जास्तीत जास्त वेळ द्या, अशा सूचना त्यांनी खासदारांना दिल्या. 
 

Web Title: BJP president Amit Shah took aggressive stand regarding alliance with Shiv sena in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.