भाजप आमदार पाटणी यांनी केला ५०० कोटींचा जमीन घोटाळा, भावना गवळी यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:25 PM2021-08-20T19:25:03+5:302021-08-20T19:25:36+5:30

या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय आणी ईडीलासुद्धा पत्र देणार असल्याचे खासदार गवळी यांनी म्हटले आहे.

BJP MLA Rajendra Patni commits Rs 500 crore land scam, serious allegation by Bhavana gawli | भाजप आमदार पाटणी यांनी केला ५०० कोटींचा जमीन घोटाळा, भावना गवळी यांचा गंभीर आरोप 

भाजप आमदार पाटणी यांनी केला ५०० कोटींचा जमीन घोटाळा, भावना गवळी यांचा गंभीर आरोप 

googlenewsNext

वाशिम - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २० ऑगस्ट रोजी खासदार भावना गवळी (Bhavana gawli) यांनी आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी खोटे दस्तावेज तयार करून ५०० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप पत्रपरिषदेत केला. (BJP MLA Rajendra Patni commits Rs 500 crore land scam, serious allegation by Bhavana gawli)

खासदार गवळी म्हणाल्या की, वाशिम शहरातील रिसोड मार्गावर असलेले व्यावसायीक दुकानांचे गाळे अवैधरित्या बांधलेले आहे. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. या गाळ्यांमध्ये २०१४ ते २०१७ पर्यंत अधिकृत विजेचे कनेक्शन नसताना विज कशी वापरल्या गेली, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या जागेवर फ्लॅटचे (निवासी) बांधकाम करण्याची परवानगी मागितली, त्या जागेवर व्यावसायीक दुकानांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा आरोप त्यांनी केला.

भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

याशिवाय वाशिम शहरातील शेत स.नं. ५०२ ही पुसद नाका लगतची जमीन अकृषक करण्यासाठी एकत्रीत खरेदी दाखविल्या गेली. तथापि, ही खरेदी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे. सन २००९-१० मध्ये जमीनीचे चुकीचे फेरफार तयार करण्यासाठी महसूल विभागाला भाग पाडले. वाशिम येथील एका तलाठ्याला हाताशी धरून चुकीचे दोन फेरफार तयार करावयास लावले. त्यामध्ये फेरफार क्र. ४४१९ व फेरफार ४४२० या दोन्ही फेरफारचे आधार किंवा फेरफारचा व्यवहार हा वाटणीपत्र असे चुकिचे दाखविण्यात आल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला. अशाप्रकारे शहर व ईतर ठिकाणच्या जमिनी बळकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून सुमारे ५०० कोटी रूपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला आहे.
या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय आणी ईडीलासुद्धा पत्र देणार असल्याचे खासदार गवळी यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई 

"मुख्यमंत्री ठाकरे व पोलीस गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत"
खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत. हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Web Title: BJP MLA Rajendra Patni commits Rs 500 crore land scam, serious allegation by Bhavana gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.