अशोक चव्हाण बेपत्ता - निलेश राणे

By Admin | Updated: March 28, 2017 19:28 IST2017-03-28T19:28:19+5:302017-03-28T19:28:59+5:30

अशोक चव्हाण यांच्या फोटोसह निलेश यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे निलेश राणे वादात अडकण्याची शक्यता आहे.

Ashok Chavan missing - Nilesh Rane | अशोक चव्हाण बेपत्ता - निलेश राणे

अशोक चव्हाण बेपत्ता - निलेश राणे

आॅनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 28 : 'बेपत्ता, नाव : अशोक चव्हाण, वय ५८, स्टेटस : शरीर आहे, पण काम बेपत्ता' हे ट्वीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव खासदार निलेश राणे यांचे आहे. अशोक चव्हाण यांच्या फोटोसह निलेश यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे निलेश राणे वादात अडकण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाला अशोक चव्हाण हेच कारणीभूत आहेत, असा आरोप करत खासदार नितेश राणे यांनी चव्हाण यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. आता ट्विटरवरुनही चव्हाण यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. अशोक चव्हाण बेपत्ता आहेत, असे खवचट ट्विट करुन त्यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे.
निलेश राणे यांनी पद सोडताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली होती. गेली दीड वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षच नेमलेला नाही, त्यामुळेच काँग्रेसला जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला, असा आरोप करत त्यांनी या नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट केले होते. संघटनेचा कारभार अशा पध्दतीने चालणार असेल तर मला आपल्यासोबत काम करायचे नाही, असे म्हणत निलेश यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही निलेश यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात उघडलेली आघाडी बंद ठेवलेली नाही, हे या ट्विटर युध्दामुळे उघड झाले आहे.

Web Title: Ashok Chavan missing - Nilesh Rane