दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:45 IST2017-09-18T14:44:43+5:302017-09-18T14:45:35+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Announcing the potential schedule of SSC and XII exams | दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा दि. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.

पुणे, दि. 18 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा दि. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने मंडळाकडून काही वर्षांपासून काही महिने आधीच परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. यंदाही मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येईल. हे वेळापत्रकच अंतिम असेल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा इतर सोशल मिडियावर व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
 

Web Title: Announcing the potential schedule of SSC and XII exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.