सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' इमारत लष्करानं घेतली ताब्यात

By admin | Published: July 29, 2016 06:50 PM2016-07-29T18:50:58+5:302016-07-29T21:17:33+5:30

वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लष्कराने ताब्यात घेतली आहे.

After the Supreme Court order, the army has taken possession of the 'ideal' building | सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' इमारत लष्करानं घेतली ताब्यात

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' इमारत लष्करानं घेतली ताब्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लष्कराने ताब्यात घेतली आहे. 
कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं होतं. त्यातील सदनिका नेते, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या स्वकियांच्या नावे लाटण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
या भ्रष्टाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपले मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. या प्रकारामुळे ते चांगलेच चर्चेतही आले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लष्कराने आदर्श इमारतीचा ताबा घेतला. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती देऊन ही इमारत संरक्षित करून लष्कराच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: After the Supreme Court order, the army has taken possession of the 'ideal' building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.