“आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 04:37 PM2023-08-10T16:37:44+5:302023-08-10T16:39:14+5:30

सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असे सांगितले नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

advocate asim sarode reaction over 16 mla disqualification case and criticized assembly speaker rahul narvekar | “आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत”

“आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत”

googlenewsNext

Rahul Narvekar Vs Asim Sarode: आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. यानंतर शिंदे गटाच्या सदस्यांनी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीला सुरुवात करणार आहेत. मात्र, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, यासाठी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणी १४१ पानांचा निकाल दिला होता. त्यात परिच्छेद ११० आणि १११ मध्ये रिझनेबल टाईममध्ये याप्रकरणाचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. पण, रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असं सांगितले नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. ही संवैधानिक अनैतिकता आहे. मणिपूरमधील के. मेघचंद्र विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांत निकाल दिला पाहिजे. गुंतागुंतीची परिस्थिती असेल, तर ३ महिने आणि सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांमध्ये निकाल लागला पाहिजे, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटले आहे. 

योजना तयार केल्या जात आहेत

 १६ आमदारांच्या संदर्भात कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप असीम सरोदे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर कार्यवाही करण्याचे काम राहुल नार्वेकरांना करायचे होते. पण, कोणतेही काम राहुल नार्वेकरांनी केलेले नाही. नार्वेकरांनी वेळकाढूपणासाठी शिवसेनेची मूळ घटना अभ्यास करायची आहे, असे सांगून निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी केली. घटनेचा अभ्यास करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा काही संबंधच नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला. 

दरम्यान, भरत गोगावले यांची प्रतोदपदी आणि एकनाथ शिंदे यांची राहुल नार्वेकरांनी गटनेतेपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले. सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद आहेत. त्यांनी काढलेल्या व्हीपवर राहुल नार्वेकरांनी काय कार्यवाही केली, अशी विचारणा करत व्हीपच्या विरुद्ध कार्यवाही करणारे सर्वजण अपात्र आहेत. याचा अर्थ १६ आमदार अपात्र आहेत. त्यानंतर बाकीचे गेलेले आमदारही पक्षविरोधी कारवाई केल्याने अपात्र ठरतात, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: advocate asim sarode reaction over 16 mla disqualification case and criticized assembly speaker rahul narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.