मालेगावच्या युवकाजवळून ३ पिस्तुले जप्त

By Admin | Updated: May 11, 2017 03:04 IST2017-05-11T03:04:21+5:302017-05-11T03:04:21+5:30

मालेगाव येथील युवकाजवळून जिवंत काडतुसांसह ३ पिस्तुले ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी भिवंडीनजीकच्या वडपे येथून जप्त केली.

3 pistols seized from Malegaon's youth | मालेगावच्या युवकाजवळून ३ पिस्तुले जप्त

मालेगावच्या युवकाजवळून ३ पिस्तुले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मालेगाव येथील युवकाजवळून जिवंत काडतुसांसह ३ पिस्तुले ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी भिवंडीनजीकच्या वडपे येथून जप्त केली. वसीम अली शेख (३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने आरोपीला १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ठाणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी भिवंडी परिसरात गस्त घालत असताना, वडपे गावातील सिद्धू धाब्यावर एक जण पिस्तुले विकण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने लगेच धाब्याजवळ पोहोचून पाळत ठेवली. काही वेळानंतर एक युवक संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ तीन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. भिवंडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ती मध्य प्रदेशातून आणली असल्याची माहिती प्राथमिक तपासातून मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 3 pistols seized from Malegaon's youth