भूखंड प्रकरणात शासनाची फसवणूक; २१ जणांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Published: December 4, 2022 09:07 PM2022-12-04T21:07:28+5:302022-12-04T21:07:58+5:30

तक्रारदाराला तू न्यायालयात तक्रार केलीस, तर तुझ्या खांडाेळ्या करू, अशी धमकी दिली

Fraud of Government in Plot Case; Crime against 21 persons | भूखंड प्रकरणात शासनाची फसवणूक; २१ जणांवर गुन्हा

भूखंड प्रकरणात शासनाची फसवणूक; २१ जणांवर गुन्हा

Next

लातूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या भूखंड प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात २१ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, सुधाकर नागाेराव माने (वय ३७ रा.कन्हेरी चाैक, लातूर) यांनी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लातूर एमआयडीसीत महाराष्ट्र शासनाचा १ हजार चाैरस मीटरचा भूखंड (क्रमांक पी - १०) बळकावण्याच्या उद्देशाने बनावट शिक्के आणि चुकीची कागदपत्रे तयार केली, शिवाय लातूर जिल्हा उद्याेग समूह संस्था अस्तित्वात नसताना ती आहे. असे भासवत संस्थेचे पदाधिकारी म्हणून सह्या करून भूखंड हडप केला. त्याचबराेबर, तक्रारदाराला तू न्यायालयात तक्रार केलीस, तर तुझ्या खांडाेळ्या करू, अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत चंदुलाल बालकृष्ण बलदवा, प्रकाश संपतलाल शर्मा, व्यंकटराव मुकुंदराव गर्जे, सुनील हरीनारायण लाेहिया, अजय देविदासराव निलगावकर, रतनलाल नंदलाल बिदादा, मधुसूदन जगन्नाथ साेनी, बसवअप्पा लिंगणअप्पा पाटणकर, भारत त्रिंबकराव माळवदकर, जयप्रकाश बालकिशन खटाेड, मल्लिकार्जुन रेवणसिद्धप्पा जवळे, शिरीष लक्ष्मीनारायण भुतडा, अशाेक श्रीनिवास कलंत्री, हेमंत द्वारकादास नावंदर, प्रवीण गाेपीनाथ पेन्सलवार, याेगेश जगन्नाथ ताेतला, रवींद्र ईश्वरप्रसाद राठी, श्रीनिवास जयवंतराव माेटलावार, जुगलकिशाेर बालकिशन तापडिया, चंद्रकांत रामेश्वर काळे आणि गिराधारी रामकृपाल तिवारी यांच्या विराेधात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. ६९९/२०२२ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४६५, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयात घेतली हाेती धाव...

दरम्यान, याबाबत संभाजीसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने आणि ॲड.व्यंकटराव नाईकवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हाेती. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. लातूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी संपूर्ण बाजू तपासल्यानंतर, या प्रकरणात कलम १५६ (३) प्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश एमआयडीसी पाेलिसांना दिल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले हाेते.

Web Title: Fraud of Government in Plot Case; Crime against 21 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर