व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:43 PM2019-01-02T17:43:13+5:302019-01-02T17:44:26+5:30

 व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूक, तुमचीही होऊ शकते. व्हीआयपी नंबरचे सीमकार्ड देतो असे सांगून एकाची सुमारे दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कुमार टेकचंद जैन (वय ५२, रा. ५५०, सी आझाद गल्ली, कोल्हापूर ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Wrap VIP numbers, then be careful, they got cheated | व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूक

व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूक

Next
ठळक मुद्दे व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूकदोन हजार रुपयांची फसवणूक, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर :  व्हीआयपी नंबर हवाय, मग सावधान, त्यांची झाली फसवणूक, तुमचीही होऊ शकते. व्हीआयपी नंबरचे सीमकार्ड देतो असे सांगून एकाची सुमारे दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कुमार टेकचंद जैन (वय ५२, रा. ५५०, सी आझाद गल्ली, कोल्हापूर ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, पीयूष सोनी (पूर्ण नाव माहीत नाही) याने कुमार जैन यांच्या व्हॉट्स अ‍ॅप मोबाईल नंबरवर १० ते १२ व्हीआयपी मोबाईल नंबर पाठवून एका नंबरची किंमत ८००० रुपये असल्याचे सांगितले.

त्यांपैकी एक निवडलेला नंबर ९१९९९९९९९९ चे सिमकार्ड घरी घेऊन येतो, असे सांगून जैन यांच्याकडून आधार कार्ड, मेल आयडी घेऊन जैन यांच्याकडूनच दोन हजार रुपये पीटीएमद्वारे मोबाईल नंबर ७६८९८८३०८० वर घेतले. त्यानंतर सीमकार्ड न देता फसवणूक केली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Wrap VIP numbers, then be careful, they got cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.