ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांचे निधन

By admin | Published: January 26, 2015 12:32 AM2015-01-26T00:32:33+5:302015-01-26T00:37:16+5:30

ते ८८ वर्षांचे होते़

Senior Reviewer The Hathkangalakar passed away | ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांचे निधन

ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांचे निधन

Next

सांगली : साक्षेपी समीक्षक तथा अ़ भा़ मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे आज, रविवारी वार्धक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते़ त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत दीड वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे १ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या हातकणंगलेकर यांनी मराठी साहित्य निर्मितीतील प्रेरणा व प्रवृत्ती यावर सुमारे ५५ वर्षे लेखन केले. सौंदर्यशास्त्र, समीक्षा, कथा, कादंबरी, ललितलेखन अशा साहित्यप्रकारांचे आस्वादक समीक्षक म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्र शासनाने १९७६ मध्ये ‘आदर्श प्राध्यापक’ म्हणून त्यांना गौरविले होते. सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

Web Title: Senior Reviewer The Hathkangalakar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.