कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर सदाभाऊंच्या नवीन संघटनेची घोषणा उद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:38 PM2017-09-19T20:38:05+5:302017-09-19T20:54:21+5:30

कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेची घोषणा उद्या, गुरुवारी होणार

Sadabhau new organization announced tomorrow | कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर सदाभाऊंच्या नवीन संघटनेची घोषणा उद्या

कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर सदाभाऊंच्या नवीन संघटनेची घोषणा उद्या

Next
ठळक मुद्देजिल्'ातील शेतकºयांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेशदादा पाटील यांनी केले आहे.त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरविला

कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेची घोषणा उद्या, गुरुवारी होणार आहे. अंबाबाई व राजर्षी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन संघटनेचा बिल्ला व मसुदा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक सुरेशदादा पाटील यांनी दिली. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरविला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते आपल्या नवीन संघटनेची अधिकृत घोषणा करणार आहेत.

गुरुवारी सकाळी बारा वाजता राज्यमंत्री खोत करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे मेळाव्यात संघटनेचे नाव, बिल्ला व मसुदा जाहीर करणार आहेत. जिल्'ातील शेतकºयांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेशदादा पाटील यांनी केले आहे.

दसरा मेळावा होणारच!
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करण्यासाठी गुरुवारचा मेळावा घेतला आहे. इचलकरंजी ३० सप्टेंबरला दसरा मेळावा होणारच तिथे संघटनेची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sadabhau new organization announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.