राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:59 AM2019-03-08T04:59:11+5:302019-03-08T04:59:26+5:30

आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली.

RAFEL DOCUMENTATION CRISIS CRITICAL CAUTION - Sharad Pawar | राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

Next

कोल्हापूर : आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली. आता राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याचे सरकार सांगत आहे. ही बाब अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. पलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यग्र होते, अशी टीकाही पवार यांनी केली.
येथील राष्टÑवादी कॉँग्रेसचे बूथ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, जवानांच्या वाहनांवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली; पण पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे पक्षप्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती. प्रधानमंत्री तर हल्ल्यानंतरही कामांची उद्घाटने करीत, पक्षाचा प्रचार करीत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टीका केली नाही. निवडणुका येतील, जातील. अशा कठीण प्रसंगात लष्कराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. दुर्दैवाने जवानांच्या त्यागाचा राजकीय लाभ उठविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, असे पवार म्हणाले.
सरकारकडून जनतेची फसवणूक
सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्या सगळ्या फसव्या निघाल्या आहेत. नोटाबंदी केल्यामुळे १५ लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. कर्जाचा बोजा वाढतोय तशा आत्महत्याही वाढत आहेत. जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत या सरकारच्या कारकिर्दीत ११ हजार ९९८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी केवळ महाराष्टÑाची आहे. समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. पण त्यातही फसवणूक केली गेली, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: RAFEL DOCUMENTATION CRISIS CRITICAL CAUTION - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.