कोल्हापूर :  ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:57 IST2018-09-01T11:52:33+5:302018-09-01T11:57:40+5:30

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली २८ वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर वागवणाऱ्या पवार यांना यानिमित्ताने राज्यपातळीवरील हे मोठे पद देण्यात आले आहे.

Kolhapur: Sanjay Pawar was elected as the Vice President of 'Annasaheb Patil Mahamandal' | कोल्हापूर :  ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवार

कोल्हापूर :  ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवार

ठळक मुद्दे ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवारदेर है लेकिन अंधेर नही है : संजय पवार

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूरशिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली २८ वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर वागवणाऱ्या पवार यांना यानिमित्ताने राज्यपातळीवरील हे मोठे पद देण्यात आले आहे.

सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आक्रमकपणे काम करणाऱ्या संजय पवार यांनी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख, कोल्हापूर शहरप्रमुख आणि गेली ९ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. याच दरम्यान तीनवेळा ते कोल्हापूर महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न मांडणारा आक्रमक नेता, अशी पवार यांची प्रतिमा आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्यामध्ये मतभेद असले, तरी पवार यांनी नेटाने संघटनेचे काम सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कामाची दखल घेत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करून त्यांना न्याय देण्यात आला आहे.


 

देर है लेकिन अंधेर नही है

गेली २८ वर्षे शिवसेनेमध्ये मी काम करत आहे. अनेक अडचणीचे प्रसंग आले, प्रलोभने दाखवली गेली; मात्र संघटना सोडली नाही. ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे. आमच्या संघटनेमध्ये ‘देर है लेकिन अंधेर नही है’ हे स्पष्ट झाले. आतापर्यंतच्या निष्ठेचे फळ मिळाल्याचा आनंद आहे.
- संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना /> 

 

Web Title: Kolhapur: Sanjay Pawar was elected as the Vice President of 'Annasaheb Patil Mahamandal'