चिमासाहेब महाराजांचा सर्वांनी आदर्श घ्यावा

By Admin | Updated: January 9, 2015 00:12 IST2015-01-08T23:31:42+5:302015-01-09T00:12:53+5:30

विवेक घाटगे : छत्रपती चिमासाहेब महाराज यांची १७५ व्या जयंती

Everyone should take the role of Chimasaheb Maharaj | चिमासाहेब महाराजांचा सर्वांनी आदर्श घ्यावा

चिमासाहेब महाराजांचा सर्वांनी आदर्श घ्यावा

कोल्हापूर : थोर स्वातंत्र्यसेनानी छत्रपती चिमासाहेब महाराजांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केले. ते स्वातंत्र्यसेनानी छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्र्यक्रमात बोलत होते. हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक मधुकर रामाणे अध्यक्षस्थानी होते.
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने टाऊन हॉलजवळील चिमासाहेब चौक येथे आयोजित चिमासाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी अ‍ॅड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. के.व्ही. पाटील, सचिव अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक यांच्या हस्ते छत्रपती चिमासाहेब पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक किसन कल्याणकर यांनी स्वागत केले.
यावेळी अ‍ॅड. अशोक एच. पाटील, अ‍ॅड. दीपक ग. पाटील, अ‍ॅड. गिरीश नाईक, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, अ‍ॅड. पिराजी भावके, अ‍ॅड. विनय महाजन, अ‍ॅड. प्रल्हाद पाटील, अ‍ॅड. भीमराव सातपुते, मुकादम भीमराव कांबळे, महादेव बामणे, पवन कांबळे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे जयकुमार शिंदे, रामेश्वर पत्की, महादेवराव जाधव, किशोर घाटगे, मदन चोडणकर, आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: Everyone should take the role of Chimasaheb Maharaj