कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळेत गव्याचा मृत्यू, वन्यप्रेमींमध्ये हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:24 AM2023-04-18T11:24:09+5:302023-04-18T11:25:30+5:30

पाण्याच्या शोधात गवा भरकटल्याचा अंदाज

Death of gaur in Kasba Arle of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळेत गव्याचा मृत्यू, वन्यप्रेमींमध्ये हळहळ

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळेत गव्याचा मृत्यू, वन्यप्रेमींमध्ये हळहळ

googlenewsNext

निवास वरपे 

म्हालसवडे : कसबा आरळे (ता. करवीर) येथे शिवारात  चार वर्षे वयाच्या मादी गव्याचा मृत्यू झाला. फुफुसाचा आजार असल्याने गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गव्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कसबा आरळे गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील मल्लेवाडी येथील जंगली भागांमध्ये गव्यांचे वस्तीस्थान आहे. त्या परिसरातील जंगली भागामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने गवे तुळशी नदी शेजारील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, पाली, कसबा आरळे या परिसरात भटकू लागले आहेत. काल, सोमवारी दुपारी पाण्याच्या शोधात ओढ्याच्या काठाने फिरत असलेला गवा नागरिकांच्या निदर्शनास आला होता. दरम्यान ग्रामस्थांनी वन्यजीव बचाव पथक व वन विभागाला याची माहिती दिली. 

वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ओढ्याच्या काठाने दिवसभर फिरणारा गवा उसाच्या शेतात जाऊन बसला होता. सायंकाळच्या सुमारास हा गवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लिंग दळा नावाच्या शेतात मृतावस्थेत आढळला. पशुधन विकास अधिकारी युवराज शेट्टे, डॉ. प्रशांत लंबे यांनी मृत गव्याचे शवविच्छेदन केले. वनरक्षक आर. के. जोनवाल, वनक्षेत्र अधिकारी आर. एस. कांबळे, विजय पाटील, युवराज भोगम, एकनाथ जाधव यांनी या घटनेचा पंचनामा केला. सायंकाळी  वनक्षेत्रपालांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गव्याचे दहन केले. 



पाण्याच्या शोधात उन्हातून फिरत असणारा भरकटलेला हा गवा असावा.  फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. - डॉ. युवराज शेट्टे, पशुधन विकास अधिकारी.

Web Title: Death of gaur in Kasba Arle of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.