न्यू पॅलेसवर मुख्यमंत्र्यांचा सत्कार

By Admin | Updated: June 27, 2016 01:14 IST2016-06-27T01:06:37+5:302016-06-27T01:14:58+5:30

रविवारी मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आले होेते; परंतु यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

Chief Minister felicitates on New Palace | न्यू पॅलेसवर मुख्यमंत्र्यांचा सत्कार

न्यू पॅलेसवर मुख्यमंत्र्यांचा सत्कार

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी न्यू पॅलेस येथे छत्रपती परिवाराची सदिच्छा भेट घेऊन स्नेहभोजन केले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
शनिवारी (दि. २५) ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी न्यू पॅलेसला भेट देऊन छत्रपती परिवारासोबत भोजन केले होते. त्यातच रविवारी मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आले होेते; परंतु यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महाराणी याज्ञसेनी, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांनी स्वागत केले.यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती परिवारासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महेश जाधव, विजय जाधव, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, व्ही. बी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. शाहूजयंतीदिनी छत्रपती परिवाराकडून झालेल्या या सत्काराने मुख्यमंत्री भारावून गेल्याचे दिसले. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister felicitates on New Palace