चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 17:26 IST2018-09-23T16:50:27+5:302018-09-23T17:26:14+5:30
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला; गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी
कोल्हापूर : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरच लेझीमचा ताल ठरला. तर खासदार धनंजय महाडिक यांनी हलगी वाजविली.
खासबाग मैदानातून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटून आणि ‘श्रीं’च्या विविध रूपातील मूर्ती पाहत मिरवणूक मार्गावर फेरी मारली. त्यावेळी मिरवणुकीतील एका मंडळातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाटील यांना लेझीम खेळण्याचा आग्रह केला. त्यावर, मंत्री पाटील यांनीही खड्डेमय रस्त्यावरच उत्साहाने लेझीमचा ताल ठरला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी एका मंडळासमोर हलगी वाजविली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत नृत्याचा फेर धरला. या लोकप्रतिनिधींनी मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
पाहा व्हिडीओ -