आजरा कारखाना निवडणूक: सतेज पाटील, विनय कोरे गटाने उधळला पहिला गुलाल; संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:22 PM2023-12-01T16:22:48+5:302023-12-01T16:25:09+5:30

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे गटाला विजयाचा पहिला गुलाल लागला. माघारीदिवशी ...

Ajara Factory Election: Satej Patil, Vinay Kore Group First Win; Sambhaji Patil was elected unopposed | आजरा कारखाना निवडणूक: सतेज पाटील, विनय कोरे गटाने उधळला पहिला गुलाल; संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड

आजरा कारखाना निवडणूक: सतेज पाटील, विनय कोरे गटाने उधळला पहिला गुलाल; संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे गटाला विजयाचा पहिला गुलाल लागला. माघारीदिवशी भटक्या विमुक्त जाती गटातून शिवसेनेचे संभाजी पाटील यांची बिनविरोध निवडून झाली. बजाजी मिसाळ यांनी माघार घेतल्याने चराटी - शिंपी - रेडेकर - शिंत्रे गटाला पहिल्यांदाच यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात पॅनेल उभे केल्याने दुरंगी लढत होणार आहे.

गेल्या पाच दिवसांपासून या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे हे करत होते. परंतु जागा वाटपानंतर अचानक राष्ट्रवादीने निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सतेज पाटील, विनय कोरे यांनी एकत्र येत आपली आघाडी जाहीर केली. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर माघारीच्या दिवशी सकाळी निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांना घ्यावा लागला.  

मात्र, अर्ज माघारीदिवशीच भटक्या विमुक्त जाती गटातून बजाजी मिसाळ व विकास बागडी यांनी माघार घेतल्याने संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे देवचाळोबा विकास आघाडीला पहिलेच यश मिळाले. छानणीनंतर १४६ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ९९ जणांनी आज माघार घेतली तर ४७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. २० जागेसाठी ४१ अर्ज व ६ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. 

Web Title: Ajara Factory Election: Satej Patil, Vinay Kore Group First Win; Sambhaji Patil was elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.