मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

By अनिकेत घमंडी | Published: February 28, 2024 09:51 AM2024-02-28T09:51:09+5:302024-02-28T09:51:22+5:30

मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी.

No reduction in local trains on Sundays on Mumbai - Kalyan Main Line, Transharbour | मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

 डोंबिवली: मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी. त्या मागण्यांमधील वस्तुस्थिती तपासून जे काही करता येईल ते करून दिलासा द्यावा. विशेषतः रविवारी कुटुंबासह प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्यांत कपात करू नये, हे पाऊल तातडीने उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेने रेल्वे बोर्ड दिल्ली, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे टिटवाळा, बदलापूर आले तेव्हा त्यांची भेट घेत थेट पत्र देण्यात आले. त्याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, लीना भागवत, उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी सांगितले की, सकाळ - संध्याकाळ गर्दीच्या वेळी ठाण्याहून कसारा, कर्जत खोपोलीसाठी अधिक संख्येने लोकल चालवाव्यात. दिवा पनवेल सेक्शनवर पलावा येथे टर्मिनस विकसीत करावे. कळवा व मुंब्रा स्टेशनात काही जलद लोकलना हाँल्ट असण्याची आवश्यकता. मध्य रेल्वेवर कल्याण ते टिटवाळा, बदलापूर दरम्यानच्या स्टेशनातील प्लँटफाँर्मची लांबी वाढवणे, जेथे शक्य नाही, त्या स्टेशनात डबल हॉल्टव्दारे १५ डब्या लोकलच्या संख्या चालवणे. ट्रान्सहार्बरवर ठाणे-पनवेल-ठाणे लोकलची संख्या वाढवणे.

ठाणे - नेरूळ लोकलचा विस्तार उरण पर्यंत करून, ठाणे - उरण थेट लोकल सेवा सुरू करावी. पनवेल/वाशीहून ट्रान्सहार्बर मार्गे ठाण्याला येणाऱ्या काही लोकलचा पुढे मेन लाईन मार्गे छशिमट पर्यंत विस्तार करावा. एसी लोकल सुरू केल्या आहेत, त्या वेळेत चालवाव्यात, फर्स्टक्लासचे तिकीट एसी लोककला लागू करावे, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान दादर स्टेशनाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही स्टेशनात दुसऱ्या काँरीडाँरवर टर्मिनेशन, रिव्हरसिंग सोय असलेला होमप्लँटफाँर्म नाही.

असा होमप्लँटफाँर्म कुर्ला व ठाणे स्टेशनात विकसित करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वडाळा येथे रिव्हरसिंग ने पनवेल - गोरेगाव लोकल चालवल्या जातात, त्याच पध्दतीने ठाणे येथे रुव्हरसिंग ने वाशी/पनवेल ते कल्याण/कसारा/कर्जत दरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू करणे. त्यासाठी ठाणे स्टेशन व कळवा खाडी दरम्यान आवश्यक ते क्रॉसओव्हर बसवणे. कल्याण स्टेशन रिमोडेलिंग च्या काम अधिक वेगाने पूर्ण करणे, वसई दिवा पनवेल रोहा सेक्शनवर कमी फेऱ्यांचे वेगळे वेळापत्रक नको. तसेच वसई दिवा पनवेल दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दर एक तासाने मेमू लोकलच्या फेऱ्या आवश्यक असल्याचे पत्रात म्हंटले आहे.

Web Title: No reduction in local trains on Sundays on Mumbai - Kalyan Main Line, Transharbour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.