...आणि मृगगड सुरक्षित झाला

By मुरलीधर भवार | Published: April 8, 2024 07:29 PM2024-04-08T19:29:15+5:302024-04-08T19:29:23+5:30

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेची टीम गेले कित्येक वर्ष किल्ल्यावर संवर्धनाचे काम करीत आहेत, किल्ल्यावरील पाण्याचे टाके, वास्तू आणि मार्ग यांची स्वच्छ्ता केली आहे.

...and Mirgad was secured | ...आणि मृगगड सुरक्षित झाला

...आणि मृगगड सुरक्षित झाला

कल्याण-पाली खोपोली मार्गापासून जवळच असलेल्या मृगगडावर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वसाळ्यात केल्या जाणाऱ्या ट्रेकिंग दरम्यान गिर्यारोहकांच्या निष्काळजीपणामुळे काही अपघात झाले आहेत. या गडावर सुखरुप पोहचण्याकरीता काही गिरीरोहक प्रेमी आणि संस्थांनी एकत्रित येऊन हा गड चढाईकरीता सुरक्षित ेकेला आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेची टीम गेले कित्येक वर्ष किल्ल्यावर संवर्धनाचे काम करीत आहेत, किल्ल्यावरील पाण्याचे टाके, वास्तू आणि मार्ग यांची स्वच्छ्ता केली आहे.
किल्ल्यावरील कातळ कोरीव पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होतात, गवत वाढल्यामुळे आणि वरून माती वाहून आल्यामुळे त्यावर पाय नीट ठेवता येत नाही आणि खोबण्या मात्ती ने भरून जातात आणि चढाई खूप सावधपणे करावी लागते.

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य नितीन पाटोळे,अजित राणे आणि अर्जुन दळवी यांची टीम कामाला लागली. वायर रोप, बोल्ट, फिशर प्लेट साहित्य सोबत घेऊन टीम मुंबईतून गडाच्या पायथ्याच्या भेलिव दाखल झाली. किल्ल्यावर घेऊन जायच्या सर्व सामानाची पॅकिंग करण्यात आली. टिम गडावरवर पोहचल्यावर कुठे बोल्टटिंग करायची आहे याची मार्किंग करण्यात आली. ड्रिल मशीनने बोल्टटिंग केले. खिंडीमध्ये आणि पायरी मार्गावर एकूण १८ बोल्ट मारण्यात आले. फिशर प्लेट लावण्यात आली. गडावर माप घेतल्याप्रमाणे रोप लावण्याआले. गड चढाई उतराई करण्यासाठी सुरक्षित झाला.

या मोहिमेत अर्जुन दळवी, प्रशांत डिंगणकर, विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, कृपेश बेलकर आदी सहभागी झाले होते. टेक्निकल टीम म्हणून ॲडवेंचर इंडीया टीम मधून प्रशांत खैरनार, अमित खरात, मनोज भालेघरे आणि मंगेश बाळू कोयंडे सहभागी झाले होते.
लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्थेचे बॅटरीवर चालणारी ड्रिल मशीन दिली. त्यामुळे बोल्टटिंग कमी वेळेत पूर्ण झाली.

Web Title: ...and Mirgad was secured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड