दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:45 PM2021-09-09T17:45:39+5:302021-09-09T17:48:19+5:30

जेव्हा दोन लोकांचं पटत नाही, त्यांच्यात वाद किंवा भांडण असतं, वैर असतं तेव्हा दोघांमध्ये '३६ चा आकडा' आहे असं म्हटलं जातं.

Why we use 36 ka aankda for two enemy people | दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य?

दोन वैऱ्यांमध्ये नेहमीच '३६ चा आकडा' च का असतो, काय आहे यामागचं रहस्य?

googlenewsNext

'३६ चा आकडा'...ही म्हण तर सर्वांनीच ऐकली असेल. अनेकजण बऱ्याचदा याचा वापरही करतात. जेव्हा दोन लोकांचं पटत नाही, त्यांच्यात वाद किंवा भांडण असतं, वैर असतं तेव्हा दोघांमध्ये '३६ चा आकडा' आहे असं म्हटलं जातं. म्हणजे असे लोक ज्यांना एकमेकांचा चेहराही बघायचा नसतो. पण प्रश्न हा आहे की, यासाठी केवळ ३६ चाच आकडा का ३२, ३३, ३४, ३५, ३७ ३८ का नाही? चला जाणून घेऊ नेमकं प्रकरण....

हे असं असण्याचं उत्तर आपल्या देवनागरी अंकामध्ये लपलं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, ३६ हा आकडा लिहिण्यासाठी ३ आणि ६ हे दोन आकडे एकत्र आणावे लागतात. पण या दोन्ही आकड्यांमध्ये असं काहीच खास नाही की दोन विरोधकांसाठी याचा वापर करावा. लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, ३ आणि ६ हे देवनागरीत लिहिले आहेत.  (हे पण वाचा : नॉलेज! गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'गुंडा' शब्दाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या कथा)

तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर हे दोन्ही अंक एकसारखे वाटतात. पण उलट दिसतात. म्हणजे ३ ला उलटं केलं तर ६ बनतो. तेच ६ ला उलटं केलं तर ३ बनतो. जेव्हा तुम्ही हे दोन्ही अंक एकत्र लिहिता तेव्हा दोन्ही अंक एकमेकांच्या विरूद्ध दिसतात. जणू दोघे एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत. जसे दोन्ही अंक एकमेकांच्या विरोधात आहेत. (हे पण वाचा : टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान)

आधी रोमन नंबरच्या जागी देवनागरी नंबरच चालत होते. तर त्याचा लॉजिकवर '३६ चा आकडा' ही म्हण बनली. म्हणजे जे लोक एकमेकांचे विरोधी असतात, आपण त्यांच्यासाठी याच म्हणीचा वापर करतो. आज भलेही लोक रोमन नंबरचा वापर करतात, पण तरीही ही म्हण आताही वापरली जाते आणि कदाचित नेहमी वापरलीही जाईल.
 

Web Title: Why we use 36 ka aankda for two enemy people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.