'या' ठिकाणी चुकूनही घेऊ नका Selfie, होईल मृत्यूदंडाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:30 PM2019-04-10T16:30:42+5:302019-04-10T16:37:28+5:30

या ठिकाणी सेल्फी घेणं पडू शकतं महागात, इतकं की, तुम्हाला कठोर शिक्षा होऊ शकते.

Thailand tourists could face death penalty for taking selfies at this beach in Phuket | 'या' ठिकाणी चुकूनही घेऊ नका Selfie, होईल मृत्यूदंडाची शिक्षा!

'या' ठिकाणी चुकूनही घेऊ नका Selfie, होईल मृत्यूदंडाची शिक्षा!

Next

अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्टीत थायलॅंडला जाणाऱ्यांसाठी आणि एन्जॉय करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येथील सरकारने एक नवीन कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार, Mai Khao Beach वर जर कुणी सेल्फी घेताना पकडलं गेलं तर त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. 

हा बीच फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ आहे. त्यामुळे विमान येथून फार जवळून उडतात. अशात बीचवर फिरणारे पर्यटक फोटो काढतात किंवा सेल्फी घेतात. यात ते वेगवेगळ्या अ‍ॅंगलने फोटो काढतात. 

अडचण ही आहे की, लोकांच्या या वागण्यामुळे आणि चमकणाऱ्या फ्लॅश लाइट्समुळे पायलटला अडचण होते. अनेकदा काही अपघात होता होता राहिले आहेत. त्यामुळे या बीचवर आता सेल्फी किंवा फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांचं मत आहे की, ज्याप्रकारे ड्रोन किंवा लेजर पेनने पायलटचं लक्ष दुसरीकडे भरकटलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे सेल्फी घेणाऱ्यांना पाहूनही पायलट लक्ष भरकटू शकतं. याने मोठा अपघातही होऊ शकतो. 

केवळ बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाच नाही तर स्थानिक लोकांनाही यासाठी सूचना देण्यात आली आहे. या परिसरात विमान आल्यावर ड्रोन कॅमेरा किंवा फ्लॅशचा वापर करु नये असा आदेश देण्यात आला आहे. 

या कायद्यानुसार, या नियमाचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, याप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा विचार करणे ही विचित्र बाब आहे. 

लोकांनी येथील सरकारला यावर काही सूचनाही दिल्या आहेत. लोकांनी सांगितले की, जर असं काही करायचं असेल तर बीचचा तो भाग बंद करा. पण मुद्दा हा आहे की, याने पर्यटनातून होणाऱ्या कमाईवर परिणाम होईल. 

Web Title: Thailand tourists could face death penalty for taking selfies at this beach in Phuket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.