विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 02:49 PM2022-11-29T14:49:28+5:302022-11-29T14:58:57+5:30

तुर्कस्तानच्या सॅमसन प्रांतात एका व्यक्तीची त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Strange incident! 32-year-old man shot dead; Accused of murder by his own pet dog | विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर

विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर

Next

तुर्कस्तानच्या सॅमसन प्रांतात एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीची त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याचा पाय चुकून बंदुकीच्या ट्रिगरवर पडल्याने गोळी सुटली आणि थेट त्या व्यक्तीला लागली. या गटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृतक त्याच्या मित्रांसोबत किजलान पठारावर शिकारीला गेला असताना ही विचित्र घटना घडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कुत्र्याने झाडली गोळी
मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचे नाव ओझगुर गावरेकोग्लू(32) असे आहे. मृतक त्याच्या मित्रांसोबत किजलान पठारावर शिकारीला गेला होता. यावेळी त्याच्या पाळीव कुत्र्याचा पाय शॉटगनच्या ट्रिगरवर पडला आणि लोडेड शॉटगनमधून गोळी गावरेकोग्लूला लागली. गोळी लागताच तो जागीच कोसळला.

10 दिवसांपूर्वी वडील झाला
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतक 10 दिवसांपूर्वीच मुलाचा बाप झाला होता. या घटनेनंतर मृत ओऱझगुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एकामध्ये तो शिकार केलेल्या पक्ष्यांचे मृतदेह हातात धरून उभा दिसत आहे. इतर फोटोंमध्ये तो आपल्या पाळी कुत्र्यांसोबत दिसत आहे. मात्र, कोणत्या कुत्र्याने गोळी झाडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काही तुर्की माध्यमांनी गॅव्रेकोग्लूची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पाळीव कुत्र्याने हत्या केल्याचा बनाव करत असल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये अशीच एक घटना घडली होती. सशाची शिकार करताना एका माणसाच्या पाठीत चुकून त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडली होती.

Web Title: Strange incident! 32-year-old man shot dead; Accused of murder by his own pet dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.