म्हणून तो न्यूड होऊन करायचा चोरी,  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 06:13 PM2017-10-31T18:13:05+5:302017-10-31T18:21:19+5:30

चोरी करताना चोरांनी वापरलेल्या अजब हातखंड्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  अनेक चोर चोरी करताना आपली ओळख लपवून ठेवण्याची सर्वतोपरी खबरदारी घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र चोराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

So he wanted to be nude, steal video on social media viral | म्हणून तो न्यूड होऊन करायचा चोरी,  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

म्हणून तो न्यूड होऊन करायचा चोरी,  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

बीजिंग - चोरी करताना चोरांनी वापरलेल्या अजब हातखंड्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  अनेक चोर चोरी करताना आपली ओळख लपवून ठेवण्याची सर्वतोपरी खबरदारी घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र चोराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा चोर चक्क न्यूड होऊन चोरी करतो. चोरी करताना आपले कपडे खराब होऊ नयेत म्हणून हा चोर न्यूड होऊन चोरी करण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. 
हा प्रकार चीनमधील असून, चीनमधील ग्वांगदोंग प्रांतातील दोंगुआन शहरात या चोराने नऊ ठिकाणी चोरी केली आहे. तसेच सर्व नऊ ठिकाणी चोरी करताना तो  न्यूड होऊन चोरी करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोराला न्यूड होऊन चोरी करताना पाहिल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. 
अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यावर या चोराने न्यूड होऊन चोरी करण्यामागचे गुपित पोलिसांना सांगितले. "कपडे खराब होऊ नयेत म्हणून मी न्यूड होऊन चोरी करत असे. चोरी करताना शटरखालून किंवा अन्य कोणत्यातरी पद्धतीने जावे लागते. त्यामुळे कपडे खराब होऊ शकतात. त्यामुळेच मी चोरी करताना न्यूड होण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली," असे, हा चोर म्हणाला.
खरंतर चीनमधील हा पहिला प्रकार नाही. याआधी काही महिन्यांपूर्वीसुद्धा एक चोर एका रेस्टॉरंटमध्ये न्यूड होऊन चोरी करण्यासाठी घुसला होता. 

Web Title: So he wanted to be nude, steal video on social media viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.