Diwali 2018 : दिवाळीला घर सजवण्यासाठी काही खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:41 PM2018-10-30T14:41:11+5:302018-10-30T14:41:38+5:30

दिवाळी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे घराघरात दिवाळीची जोरदार तयारी बघायला मिळत आहे. घराच्या रंगरंगोटीचं आणि सजावटीचं काम सुरु आहे.

House Decoration tips for Diwali 2018 | Diwali 2018 : दिवाळीला घर सजवण्यासाठी काही खास टिप्स!

Diwali 2018 : दिवाळीला घर सजवण्यासाठी काही खास टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : Living Hours)

दिवाळी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे घराघरात दिवाळीची जोरदार तयारी बघायला मिळत आहे. घराच्या रंगरंगोटीचं आणि सजावटीचं काम सुरु आहे. पूर्वी घराच्या सजावटीसाठी केवळ दिव्यांचा वापर केला जात होतो, पण आता बाजारात वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या वस्तू तुम्ही तुमच्या कमी-जास्त बजेटनुसार घेऊ शकता. चला आम्हीही तुम्हाला दिवाळीला घर सजवण्याच्या काही टिप्स देणार आहोत. 

वेगवेगळे इलेक्ट्रिक लाइट्स

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक लाइट्स उपलब्ध आहेत. यांच्या माध्यमातून तुम्ही घरात सुंदर सजावट करु शकता. कमी प्रकाश असलेले लाइट्स किंवा तुमच्या घराच्या रंगाच्या हिशोबाने या लाइ्टसची निवड करु शकता. चला जाणून घेऊ अशाच काही लाइट्सबाबत....

एलईडी सिल्वर लाइट

याप्रकारचा लाइटने तुम्ही दिवाळीत घर सजवू शकता. कलरफुल एलइडी लाइट पूर्ण घराला प्रकाश देण्यासाठी पुरेसा आहे. हे लाइट्स जितके सुंदर असतात तितकेच ते नाजूक असतात. त्यामुळे हे लावताना आणि ठेवताना फार काळजी घ्यावी लागते.

सेंटेंड कलर चेंजिंग कॅडल्स

(Image Credit : Pinterest)

या कॅंडल्स न पेटवताही तुम्ही घरात रोषणाई करु शकता, कारण हे रिमोट बेस्ड किंवा इलेक्ट्रिक असतात. इतकेच नाही तर यात रंग बदलण्याचा पर्यायही असतो. त्यामुळे घराच्या सुंदरतेते आणखी भर पडते. 

लॅंटर्न(कंदील)

(Image Credit : Foodilicious)

लॅंटर्नने घर सजवण्याचं काम पूर्वीही केलं जात होतं आणि आजही केलं जातं. दिवाळीत घराला जर ट्रेडिशनल लूक द्यायचा असेल तर लॅंटर्न यासाठी बेस्ट पर्याय आहे. कपडा आणि कागदापासून तयार लॅंटर्न दिवाळीनंतरही घर सजवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. 

प्लॅस्टिक लाइट्स

(Image Credit : YouTube)

फूल, फळं आणि अनेक वेगवेगळ्या डिझाइनमध्ये तसेच साइजमध्ये हे लाइट्स दिवाळीच्या सजावटीसाठी बेस्ट पर्याय आहेत. कारण हे लाइट्स दिवसा तर सुंदर दिसतातच सोबतच रात्री अंधारातही याचा प्रकाश सुंदर दिसतो. 

ग्लास लॅंटर्न

(Image Credit : Pinterest)

कागज आणि कपड्याच्या लॅंटर्नपेक्षा वेगळ्या असलेल्या ग्लास लॅंटर्नमध्ये एक बल्ब असतो. पण यातून निघणारा प्रकाश पूर्ण घराला रोषणाई देतो. 

गोल्डन स्ट्रिंग लाइट

(Image Credit : DHgate.com)

गोल्डन स्ट्रिंग लाइट्सने तुम्ही तुमच्या घराला वेगवेगळ्या प्रकारे सजवू शकता. घर लहान असो वा मोठं हे लाइट्स प्रत्येक जागेसाठी परफेक्ट आहेत. घरासोबतच या लाइट्सने तुम्ही मंदिर आणि झाडेही सजवू शकता.
 

Web Title: House Decoration tips for Diwali 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.