भारतात शिकली चहा बनवायला, अमेरिकेत जाऊन उभा केला 200 कोटींचा 'बिझनेस'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 08:57 AM2018-03-29T08:57:49+5:302018-03-29T08:57:49+5:30

भारतात चहा विकून लाखो रुपयांची संपत्ती काहींनी कमावल्याची उदाहरणही आपण ऐकली आहेत.

brook eddy has made rs 227 crore by selling tea | भारतात शिकली चहा बनवायला, अमेरिकेत जाऊन उभा केला 200 कोटींचा 'बिझनेस'

भारतात शिकली चहा बनवायला, अमेरिकेत जाऊन उभा केला 200 कोटींचा 'बिझनेस'

Next

मुंबई- भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला चहा पिण्याची आवड आहे. रस्त्याच्या बाजूला, कॉलेजच्या समोर, ऑफिसच्या बाहेर जवळपास सगळ्यात ठिकाणी चहाचे स्टॉल्स पाहायला मिळतात. भारतात चहा विकून लाखो रुपयांची संपत्ती काहींनी कमावल्याची उदाहरणही आपण ऐकली आहेत. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की एक परदेशी महिला चहा विकून करोडपती झाल्याचं? तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. अमेरिकेत हा प्रकार घडला आहे. अमेरिकेत राहणारी महिला ब्रुर इडी हिने तिथे चहा विकून तब्बल 200 करोडची संपत्ती बनविली आहे. 

चहा बनविण्याची आयडिया ब्रुक इडीला भारतातून मिळाली. 2002 साली ती भारतात आली होती. त्यावेळी तिथे उत्तर भारतातील अनेक गावांना भेटी दिल्या. तिथल्या आलं घातलेल्या चहाची चव तिनं चाखली. तेव्हापासून चहाच्या ती प्रेमात पडली. खेड्यात प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या प्रत्येक चहाची चव वेगळी असते हे तिच्या लक्षात आलं. भारतातील चहाच्या प्रेमात पडलेल्या ब्रुकने कोलोरॅडोमध्ये जाऊन चहाचा स्टार्टअप सुरू केला. 2007मध्ये तिने 'भक्ती चाय' या नावाने ब्रुकने स्टार्टअप सुरू केला. 

अमेरिकेत कधीही चहाची अशी वेगळी चव न चाखलेल्या अनेकांना हा देशी चहा खूपच आवडला. विशेष म्हणजे ब्रुकने सुरू केलेल्या या स्टार्टअपमधून तिने 227 कोटी रूपये कमावले. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ब्रुक इडीनेही माहिती दिली आहे. ती वेगवेगळ्या प्रकराचे चहा विकते. भक्ती चायमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या चहा चाखण्यासाठी नेहमीच गर्दी असते. ब्रुकला भारताबद्दल अतिशय प्रेम आहे. भारतात प्रत्येत गोष्टीत विविधता पाहायला मिळाली, असं तिने मुलाखतीत म्हंटलं. 
 

Web Title: brook eddy has made rs 227 crore by selling tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.