जगभरात आजही आहेत लग्नाच्या या शॉकिंग प्रथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 04:43 PM2018-04-04T16:43:40+5:302018-04-04T16:43:40+5:30

कुठे कुठे तर लग्नाच्या अशाही पद्धती आहेत की, कुणाचा विश्वास बसणार नाही. अशाच काही लग्नाच्या विचित्र पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

7 shocking marriage rituals in world | जगभरात आजही आहेत लग्नाच्या या शॉकिंग प्रथा!

जगभरात आजही आहेत लग्नाच्या या शॉकिंग प्रथा!

Next

जगभरात लग्न हा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक समाजात लग्नाची वेगळी पद्धत आहे. कुठे कुठे तर लग्नाच्या अशाही पद्धती आहेत की, कुणाचा विश्वास बसणार नाही. अशाच काही लग्नाच्या विचित्र पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

1) महिनाभर रडते नवरी

चीनच्या सिचुआनमध्ये एक परंपरा आहे की, लग्न होणा-या मुलीला लग्नाच्या आधी संपूर्ण एक महिना रडावं लागतं. या रिवाजाला जियो टांग असं म्हटलं जातं. एक महिना रोज रात्री मुलीला अर्धा तास रडावं लागतं. पहिले दहा दिवस नवरीसोबत तिची आई, पुढचे दहा दिवस तिची आजी आणि शेवटच्या दिवसात तिचे कुटुंबिय लागोपाठ रडतात.

2) नवरीचं अपहरण 

किर्गिस्तानमध्ये आजही नवरीचं अपहरण करण्याची प्रथा आहे. हे सगळं लग्नाआधी होतं. ज्या मुलासोबत तिचं लग्न होणार असतं, तो मुलगा तिचं अपहरण करतो. ही प्रथा रोमानियामध्ये आहे. लग्नात हुंडा मागितला जाऊ नये आणि मुलीच्या घरच्यानी मुलीच्या पसंतीच्या मुलासोबत तिचं लग्न लावून देऊ नये म्हणून ही प्रथा आहे. 

3) हसण्याला मनाई 

कांगो समाजात लग्न सुरु असताना नवरी-नवरदेवाला हसण्याची मनाई आहे. लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण झाल्यावरच दोघांना हसण्याची परवानगी आहे.  

4) नवरीचं टक्कल करणे

प्राचीन स्पार्टन समाजात लग्नाआधी नवरीचं टक्कल केलं जातं. या समाजात नवरी पळून जाते आणि लपते. नंतर नवरदेव तिला शोधून आणतो. तेव्हा लग्नाचे रिवाज पूर्ण झाल्याचे समजले जाते. 

5) नवरीला इजा करणे 

मसाई संस्कृतीमध्ये लग्नाची पद्धत जगावेगळी आहे. इथे नवरीला त्रास दिला जातो आणि इजा केली जाते. साखरपुड्यानंतर मुलीला एका वयोवृद्धासोबत पाठवलं जातं. इथे त्यांचं स्वागत केलं जातं. मुलीला मारलं जातं. तिच्या अंगावर शेण फेकलं जातं. 

6) नवरी-नवरदेवावर काळा रंग

स्कॉट समाजात लग्नाला तेव्हाच मान्य केलं जातं जेव्हा नवीन जोडप्यावर काळा रंग टाकला जातो. काळा रंग दोघांवर अचानक टाकला जातो. त्यांचं जीवन सुखी व्हावं यासाठी त्यांच्यावर काळा रंग टाकला जातो.

7) झाडासोबत लग्न

भारतातील काही भागांमध्ये आजही परंपरा आहे. जर एखाद्या मुलीला मंगळ असेल तर तिचं लग्न एका झाडासोबत लावलं जातं. मुलीचं लग्न पिंपळाच्यया पानासोबत लावतं जातं.

Web Title: 7 shocking marriage rituals in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न