भुसावळात तलवारी चालल्या, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 16:54 IST2017-04-15T16:54:52+5:302017-04-15T16:54:52+5:30

राहुल नगरात दंगल : दोन्ही गटाचे 11 जण जखमी

There are two serious battles in Bhusaval | भुसावळात तलवारी चालल्या, दोन गंभीर

भुसावळात तलवारी चालल्या, दोन गंभीर

 भुसावळ,दि.15- यावल रोडवरील राहुल नगरात जुन्या वादाच्या कारणातून दोन गट समोरा-समोर आल्याने झालेल्या भांडणात सर्रास तलवारींचा वापर करण्यात आला़ या हाणामारीत दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आह़े शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ घटनेनंतर भुसावळ शहर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापित केली़

शहर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या गटातील सागर सुभाष इंगळे (वय 26) व सुभाष सुभान इंगळे (56) हे गंभीर जखमी आहेत़ प्रमोद भिकाजी नरवाडे, भारत सुभाष नरवाडे हे जखमी झाले तर दुस:या गटातील सागर गाढे, सागर अरुण रणधीर, राहुल गाढे, अरुण रणधीर, कांतीलाल गाढे, राणी गाढे, छोटू (अरुणचा भाऊ, मुंबई) हे जखमी झाले आहेत़ जखमींना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शहर पोलीस जखमींचा जवाब घेण्यासाठी रवाना झाले आहेत़ 

Web Title: There are two serious battles in Bhusaval