ठळक मुद्देरात्री दीडवाजेर्पयत मित्रांसोबत गप्पा डोक्याला गंभीर जखमकोणाशीही वाद नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -  शहरातील सिनेमागृहात सिनेमा पाहून घरी आल्यानंतर कपडे बदलवून पुन्हा रात्री घराबाहेर गेलेल्या नरेश राजेंद्र बाविस्कर (वय 19, रा. कांचन नगर) या तरुणाचा शनिवारी सकाळी प्रजापत नगराजवळ रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला. डोक्याला गंभीर जखम व उजवा हातही फ्रॅर झाला आहे, त्यामुळे नरेशचा मृत्यू म्हणजे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश हा शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता सिनेमा पाहण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. सिनेमापाहून आल्यानंतर रात्री बारा वाजता घरी आला. त्यानंतर घरात कपडे बदल केले व नंतर गल्लीत  मित्रांसोबत दीड वाजेर्पयत गप्पा केल्या. यावेळी घरातील सर्व लोक झोपी गेलेले होते. सकाळी  नरेश घरात दिसला नाही व त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला असता प्रजापत नगराजवळ भुसावळ मार्गावर रेल्वे खांब क्र.421/1 ते 420/33 दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. नरेश याचा कोणाशीही वाद नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांचाही वाद अथवा भांडण नाही. तो आत्महत्याही करु शकत नाही, मग रेल्वे रुळाकडे तो गेलाच कसा असा प्रश्न अनेक नातेवाईकांना पडला आहे.