चिंचोली येथे पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबात हाणामारी

By Admin | Updated: April 12, 2017 17:23 IST2017-04-12T17:23:57+5:302017-04-12T17:23:57+5:30

चिंचोली येथे मंगळवारी रात्री दोन विरोधी कुटुंबातील जुना वाद उफाळून आला. यात हाणामारी झाली.

Predicting two family clashes in Chincholi | चिंचोली येथे पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबात हाणामारी

चिंचोली येथे पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबात हाणामारी

 जळगाव,दि.12-  तालुक्यातील चिंचोली येथे मंगळवारी रात्री दोन विरोधी कुटुंबातील जुना वाद उफाळून आला. यात हाणामारी झाली. दोन्ही गटातील महिलांनी विनयभंगाची तक्रार दिल्याने दोन्ही कुटुंबातील पुरुषांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील एक महिला जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

सरकारी नोकरीला असलेल्या एका बत्तीस वर्षीय तरुणीने न्यायालयात सुरु असलेला खटला मागे घ्यावा या कारणावरुन दबाव आणला जात  होता. त्यातूनच ही मारहाणीची घटना घडली. त्यामुळे तरुणीच्या फिर्यादीवरुन संजय शालिग्राम घुले, अनिल शालिग्राम घुले, पवन घुले यांच्या विरुद्ध मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विरोधी कुटुंबातील 47 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अनिल पंडीत पठार याने शिवीगाळ करुन, मारहाण केली तसेच कपडे फाडले तसेच  एका महिलेनही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 

Web Title: Predicting two family clashes in Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.