जळगाव शहरात जुन्या घराची भींत कोसळून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:14 IST2017-12-16T17:07:56+5:302017-12-16T17:14:43+5:30

नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना शेजारी जुन्या इमारतीची भींत अंगावर कोसळल्याने शेख इस्माईल शेख अजीज मनियार (वय ३८, रा. गेंदालाल मील, जळगाव) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता जिल्हा पेठमधील गांधी नगरात आमदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी घडली. दरम्यान, या घटनेत दुसरा एक मजुर बालंबाल बचावला आहे.

In Jalgaon city, the death of the old house collapsed and the death of the laborer | जळगाव शहरात जुन्या घराची भींत कोसळून मजुराचा मृत्यू

जळगाव शहरात जुन्या घराची भींत कोसळून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देआमदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी घडली घटना नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असताना घडली दुर्घटनादुसरा मजुर बालंबाल बचावला

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१६ : नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना शेजारी जुन्या इमारतीची भींत अंगावर कोसळल्याने शेख इस्माईल शेख अजीज मनियार (वय ३८, रा. गेंदालाल मील, जळगाव) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता जिल्हा पेठमधील गांधी नगरात आमदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी घडली. दरम्यान, या घटनेत दुसरा एक मजुर बालंबाल बचावला आहे.
गांधी नगरातील आमदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी शिरीष पाटील यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी शेख इस्माईल हा जुन्या भींतीला लागून काम करीत असताना अचानक त्याच्या अंगावर भींतीचा ढिगारा कोसळला. त्यात दाबला गेल्याने इस्माईलाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथे उपस्थित किरण सोनवणे, रोहीदास कोळी, आमदार स्मिता वाघ यांचा चालक ज्ञानेश्वर पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन इस्माईलला बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: In Jalgaon city, the death of the old house collapsed and the death of the laborer