जळगाव बस स्थानकातून महिलेची मंगलपोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:26 PM2017-08-09T13:26:54+5:302017-08-09T13:27:59+5:30

सलग दुस:या दिवशी घटना : गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

From Jalgaon bus station, the woman was hanged | जळगाव बस स्थानकातून महिलेची मंगलपोत लांबविली

जळगाव बस स्थानकातून महिलेची मंगलपोत लांबविली

Next
ठळक मुद्दे सलग दुस:या दिवशी बसस्थानकात मंगलपोत तोडून दागिने लांबविल़े सोनसाखळी, मंगलपोत लांबविल्यानंतर पोलीस ठाण्यात शहरात सोनसाखळी चोर सक्रीय

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - रक्षाबंधनासाठी यावल तालुक्यातील मनवेल येथे भावाकडे जात असलेल्या एका महिलेची मंगलपोत तोडून दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली़  या घटनेनंतर  पोलिसांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बस आणून तपासणी केली़ मात्र चोरटा सापडला नाही. दरम्यान, सलग दुस:या दिवशी सोनसाखळी लांबविल्याची घटना शहरात घडल्याने चोरटय़ांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. 
सलग दुस:या दिवशी घटना
मॉर्निग वॉक दरम्यान शिवकॉलनीतील लिलाबाई रामदास पाटील या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याची घटना सोमवारी घडली होती़ यादरम्यान लिलाबाई यांनी चोरटय़ास पकडलेही होत़े मात्र हिसका देवून तो पसार झाला होता़ यानंतर सलग दुस:या दिवशी बसस्थानकात मंगलपोत तोडून दागिने लांबविल़े या दोन्ही घटनांमुळे शहरात सोनसाखळी चोर सक्रीय झाल्याची शक्यता आह़े
दागिने खरेदीचे बिल द्या, त्यानंतरच गुन्हा दाखल
सोनसाखळी, मंगलपोत लांबविल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या तक्रारदाराला संबंधित दागिन्यांबाबत बिल मागितल़े अनेक वर्षापूर्वी सोने खरेदी केले असल्याने तक्रारदाराकडे बिल नसत़े त्याअभावी गुन्हा दाखल केला जात नाही़ केवळ लेखी तक्रार घेतली जात़े शिवकॉलनीतील गंभीर प्रकाराबाबत रामानंद पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता़ तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातही वंदना बि:हाडे यांना बिल घेवून या, यानंतर गुन्हा दाखल करु असे सांगण्यात आल़े 

Web Title: From Jalgaon bus station, the woman was hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.