भुसावळात बंद घरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:27 IST2017-09-10T19:24:18+5:302017-09-10T19:27:53+5:30

घरी कुणी नसल्याची साधली संधी : 50 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला

House burglary in the house | भुसावळात बंद घरात घरफोडी

भुसावळात बंद घरात घरफोडी

ठळक मुद्देकौटुंबिक कामानिमित्त घरमालक गेले होते पुण्यालाचोरटय़ानी घरातील रोख रक्कम व दागिने केले लंपासभुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली घराची पाहणी

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.10 : महेश नगरमधील एन.आर. पाटील यांच्या राहत्या घरी 9 रोजी चोरटय़ांनी घरफोडी करीत 50 हजार व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

महेश नगरातील एन.आर.पाटील हे आपल्या परिवारासह दवाखान्या च्या कामानिमित्त पुण्याला चार ते पाच दिवसापासून गेले होते. त्यामुळे भिका चेतराम पाटील हा रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत होता. रात्री भिका पाटील हे झोपण्यासाठी आले असता मागील लोखंडाचा दरवाजा घडण्याचा प्रय} केला. दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना बोलविले. किचन मधील खडकीतून घरात डोकावून पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक जमा झाले. नागरिकांनी याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला माहिती दिली. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र घरमालक पुण्याला गेले असल्याने नेमकी किती रक्कम गेली हे स्पष्ट झाले नाही. चोरटय़ांनी कपाटातील 50 हजारांचा ऐवज गायब केल्याची माहिती मिळाली असली तरी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: House burglary in the house