जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 13:03 IST2018-12-02T12:53:13+5:302018-12-02T13:03:27+5:30
दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार

जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे यांचे रविवारी दुपारी १२.१५ वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सावदा, ता. रावेर येथे रविवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे माजी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी संभाळली होती. तसेच १९९१ व १९९६ असे दोन वेळा त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भाजपासह विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या पत्नी श्यामला सरोदे यांचेही नुकतेच निधन झाले.