भोकरी येथे तडसाच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 18:34 IST2017-09-17T18:24:56+5:302017-09-17T18:34:38+5:30

पाचोरा तालुक्यातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

Five goats killed in a bomb attack in Bhokari | भोकरी येथे तडसाच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

भोकरी येथे तडसाच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

ठळक मुद्देचार शेळ्या व एक लहान पिल्लू केले ठारघटनास्थळी तडसाच्या पायाचे ठसेपशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण

ऑनलाईन लोकमत

वरखेडी, ता.पाचोरा : भोकरी येथील अक्सानगरातील रहिवासी रशीद रहेमान काकर यांच्या चार शेळ्या व एक लहान पिल्लू अशा पाच शेळ्यांचा 15 रोजी रात्री तडसाने फडशा पाडल्याने शेळी पालकांमध्ये घबराट पसरली आहे.

अक्सानगरातील या वस्तीला लागून शेती आहे व या शेतात बाजरीचे पीक उभे असल्याने इतर रहिवासी व शेळी पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. एकीकडे शेती व दुसरीकडे मानवी वस्ती अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी या हिंस्त्र श्वापदाचे पायाचे ठसे आढळून आले. हे ठसे वनपाल एस.टी.भिलावे यांना दाखविले असता त्यांनी सांगितले की, हा हल्ला तडसाने केलेला आहे. ज्या पद्धतीने या शेळ्यांचा फडशा पाडला आहे, यावरून व पाऊल-खुणांवरून हा हल्ला तडसाने केलेला असल्याची शक्यता आहे.

Web Title: Five goats killed in a bomb attack in Bhokari