गुलाल उधळू न दिल्याने अमळनेरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 18:08 IST2017-09-07T18:05:10+5:302017-09-07T18:08:07+5:30

रिक्षा जप्त : चार जणांविरूद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Due to not giving up the gulal, a youth was assaulted in Amalner | गुलाल उधळू न दिल्याने अमळनेरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

गुलाल उधळू न दिल्याने अमळनेरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर- गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळू न दिल्याच्या कारणावरून ७ रोजी सकाळी ११.३० वाजता सेंट्रल बँकेजवळील स्टेशन रस्त्यावर चौघांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात नीलेश गोकुळ शेले हा युवक जखमी झाला आहे. मुंदडा नगर मधील अथर्व बंगला येथील रहिवासी नीलेश गोकुळ शेले व शैलेश वायकर हे गुरुवारी सकाळी स्टेशन रस्त्यावर गप्पा मारत होते. या दरम्यान अजय प्रल्हाद बिºहाडे, विशाल विजय सोनवणे , सोनू बिºहाडे, पप्पू सोनवणे यांनी पुढे जाऊन रिक्षा आडवी केली व रिक्षातून तलवारी व धारदार शस्त्रांच्या साहाय्याने नीलेश वर हल्ला केला. हल्लेखोरांनी दगडाचाही वापर केल्याने नीलेशच्या डोक्यावर मागील बाजूस जखम झाली. तसेच त्याच्या पोटावर, पाठीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शैलेश वायकर देखील किरकोळ जखमी झाला आहे. शिवशक्ती गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन वेळी गुलाल उधळू दिला नाही म्हणून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली रिक्षा (क्र एम एच १९, व्ही ८२२३) जप्त केली आहे. चारही आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Due to not giving up the gulal, a youth was assaulted in Amalner