मुक्ताईनगरात सुरु झाला पशुधन खरेदी-विक्रीचा डिजीटल व्यापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 16:57 IST2017-12-21T16:50:25+5:302017-12-21T16:57:16+5:30
खरेदी-विक्रीसाठी येणाºया पशुधनाची बाजारातील आवक ३० टक्यांनी घटली

मुक्ताईनगरात सुरु झाला पशुधन खरेदी-विक्रीचा डिजीटल व्यापार
मतीन शेख /आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.२१ : पशुधनाच्या वाहतुकी दरम्यान होणारे वाद, येण्याजाण्याचा होणारा संभाव्य खर्च आणि हायटेक तंत्राचा वापर यामुळे मुक्ताईनगरात पशुधन विक्रीचा व्यवहार डिजिटल झाला आहे. यामुळे गुरांच्या बाजारात गुरांची संख्या ३० टक्यांनी कमी झाली आहे.
गुरांच्या बाजारातील व्यवहारात लोकांसमक्ष हातावर रूमाल टाकून बोटांच्या सांकेतिक हालचालीवर खरेदी विक्री चा व्यवहार करून देणारे व्यापारी आता व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा वापर करू लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने आता पशुधन सेकंदात खरेदीदार शेतकºयांच्या मोबाईलवर झळकतात आणि बसल्या जागेवरून व्यवहार पार पडत आहे. हा डिजिटल गुरांचा व्यापार शेतकºयांच्या आवडीचा विषय बनला आहे.
शेतकºयांना पशुधन खरेदी विक्री करायची असेल तर परिसरात भरणाºया गुरांच्या आठवडे बाजाराची प्रतिक्षा करावी लागत असे. बाजारात जादाचे पशुधन पहायचे असेल तर लांबचा प्रवास करून गुरांच्या यात्रेचा पर्याय शोधावा लागत असे. मात्र सोशल मिडीयामुळे खरेदी-विक्री सोपी झाली आहे.
हातावर रुमाल टाकून गुरांचा व्यापार
गुरांचा आठवडे बाजार म्हटला तर पंचक्रोशीतील आलेले पशुधन त्या साठी व्यवहार करून देणारे गुरांचे दलाल वजा व्यापारी शिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. शेकडो लोकां समक्ष व्यवहार घडविण्यासाठी फारसी भाषा व हातावर रूमाल टाकून होणारा व्यवहार प्रचलित आहे. सध्या शहरी भागात वेगवेळ्या पाळीव प्राणी व पक्ष्यांची पैदास किंबहुना पिल्ल आदी व्हाट्स अॅप आदी माध्यमातून विक्री प्रचलित आहे. मात्र शेती उपयोगी व दुधाळ पशुधनाची आॅनलाईन विक्री बाबतचे मोबाईल अॅप्स् सध्या अस्तित्वात नाही.
परराज्यातील पशुधनाची खरेदी-विक्री
हरियाणा मध्ये दुधाळ म्हशींची आॅन लाईन खरेदी - विक्री होत आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दलाल व व्यापारी राज्य व परराज्यात पशुधनाचे फोटो परस्परांना पाठवून बसल्या जागेवरून पशुधन खरेदी विक्री करून देत आहे. व्यापारी थेट विक्रीस असलेले पशुधन मालकाकडे जाऊन बैल व म्हशीचे फोटो सोशल मीडियाच्या साहाय्याने खरेदीदार शेतकºयांस पाठवतो. दोघांची पसंती ठरल्यास जागेवरूनच व्यवहार पूर्ण होतो. संबधित बाजाराची व्यवहार पावती करून विक्री झालेले पशुधन थेट खरेदी करणाºया शेतकºयांच्या दारावर पोहोचते केले जाते.
गुरांच्या बाजारातील ३० टक्के आवक घटली
या डिजिटल व्यवहारामुळे गुरांच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी येणाºया पशुधनाची संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. पशुधन विक्रीसाठी वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी आता शेतकरी दलाल व व्यापारी लोकांना घरीच बोलवतात खुट्यावरील पशुधन दाखवून डिजिटल व्यवहारालाच पसंती देत आहे.