दोन भावांवर चॉपर हल्ला; दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:28 PM2023-09-28T22:28:20+5:302023-09-28T22:28:40+5:30

जखमी झालेल्या विशाल परदेशी व मिथून परदेशी यांना तातडीने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Chopper attack on two brothers; Both were arrested, a case was registered in the MIDC police | दोन भावांवर चॉपर हल्ला; दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

दोन भावांवर चॉपर हल्ला; दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे  दुचाकीवर आलेल्या दोघांनी विनाकारण दोन्ही भावांवर चाकू हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवार २८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिथुन फकीरा परदेशी (२५)  हा तरुण आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील रायपूर येथे वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी मिथुन परदेशी याचा भाऊ विशाल परदेशी आणि त्याचे मित्र रात्री  गप्पा मारत असताना दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर हे दोघे जण दुचाकीने चकरा मारत होते. यावेळी विशाल परदेशी याने चकरा का मारत आहे, असा बोलण्याचा राग आल्याने संशयित  दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर या दोघांनी विशाल परदेशी व  मिथुन परदेशी या दोन्ही भावांवर चॉपरने हल्ला करून पाठीवर व हातावर वार करून जखमी केले. तसेच आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन पसार झाले.

जखमी झालेल्या विशाल परदेशी व मिथून परदेशी यांना तातडीने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान  मिथुन परदेशी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित श्रीकांत मनोहर धनगर व दुर्गेश कैलास परदेशी दोन्ही रा.रायपूर कुसुंबा ता. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहेत.

Web Title: Chopper attack on two brothers; Both were arrested, a case was registered in the MIDC police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.