वाराणसी एक्सप्रेसच्या डब्याची चाके रुळावरुन घसरली, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 19:24 IST2018-09-17T18:37:32+5:302018-09-17T19:24:43+5:30
वाराणसी-मुंबई रेल्वे कोचचे डब्बे पाचोऱ्याजवळ घसरल्याने मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

वाराणसी एक्सप्रेसच्या डब्याची चाके रुळावरुन घसरली, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
जळगाव - हुबळी-वाराणसी एक्सप्रेसच्या एका डब्याची दोन चाके रुळावरुन उतरल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. पाचोऱ्याजवळ प्लँटफॉर्म क्र 2 वर ही दुर्घटना घडली असून यात कुठलेही नुकसान झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
वाराणसी - मुंबईरेल्वे कोचचे डब्बे पाचोऱ्याजवळ घसरल्याने मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन म्हशी अचानक इंजिनसमोर आल्याने ही दुर्घटना घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. सोमवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. पाचोऱ्याजवळ प्लँटफॉर्म क्र 2 वर ही दुर्घटना घडली असून यात कुठलेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली असून रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्याचे काम वेगात सुरू आहे.