शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:51 IST2018-12-10T13:49:14+5:302018-12-10T13:51:27+5:30
नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपाच्या विजया खलसे विजयी

शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा
शेंदुर्णी, जि. जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपाच्या विजया खलसे यांनी बाजी मारली आहे.
१७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपाला १३, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ व काँग्रेसला १ जागा मिळाल्या. निकाल घोषीत होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
रविवारी येथे ७४ टक्के मतदान झाले होते. शहरातील ९ मतदान केंद्रांवरील २२ बुथवर सकाळी दहावाजेपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या. प्रत्येक केंद्राबाहेर पेलिसांचा मोठा बंदोबस्त असुन शनिवारी रात्री चारचाकी वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत कक्षात थांबुन होते.