जळगाव कारागृहात भुसावळच्या १८ कैद्यांनी उपसले उपोषणाचे हत्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:08 PM2018-02-06T23:08:16+5:302018-02-06T23:13:13+5:30
कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे भीम सैनिकांवर हल्ला झाला. त्यामुळे तेथे दंगल उसळली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. भुसावळमध्ये आंदोलनकर्त्यांवर कलम ३०७ चे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात राज्यभर दाखल गुन्ह्यामंध्ये भीम सैनिकांना तत्काळ जामीन मिळाला, भुसावळच्या प्रकरणाता मात्र अद्यापही जामीन मिळालेला नाही. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे असा आरोप या कैद्यांनी केला आहे.
प्रशासनाला दिली नोटीस
विजय उर्फ बाळा सारंग पवार या कैद्याच्या नेतृत्वाखाली १८ कैद्यांनी उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी न्यायालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मानवाधिकार आयोग, कारागृह प्रशासन यांना उपोषणाची नोटीस दिली. त्यांनतर आपआपल्या बॅरकमध्ये त्यांनी उपोषण सुरु केले. १२ बॅरेकमध्ये हे कैदी आहेत. सोमवारपासूनच जेवण बंद केल्याने प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी कैद्यांची समजूत घातली, मात्र गुन्हा मागे घेण्याच्या भूमिकेवर कैदी ठाम आहेत.
उपोषणात सहभागी कैदी
रवींद्र सुरेश पगारे, सदानंद गजानन खंडेराव, भावेश अनिल भालेराव, नितिन महेंद्र खरे, भगवान बुध्दीमान गायकवाड, श्रावण रमेश देवरे, अमोल साहेबराव बनसोडे, तुषार विद्याधर वाघ, चेतन नरेंद्र आव्हाड, नितीन राजेंद्र वाघ, विशाल संजय कोचुरे, भिमा देवमन इंगळे, आशिष शरद सोनवणे,किशोर सिध्दार्थ सोनवणे, आकाश सुनील सपकाळे, आकाश भिमराव वानखेडे, विशाल पुरुषोत्तम सपकाळे व संगीत बाजीराव खंडेराव यांचा समावेश आहे.