भोकरदन येथे नदीपात्रात साठवलेल्या करोडो रुपयाच्या वाळूसाठ्यावर तहसीलदारांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 06:31 PM2017-12-05T18:31:22+5:302017-12-05T18:39:27+5:30

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे अवैध वाळू उपसा करणा-यांवर महसूल विभागाने दुपारी कारवाई केली. पूर्णा व गिरजा नदी पाञात करण्यात आलेल्या या कारवाईत करोडो रुपयाचा अवैध वाळूसाठा आढळून आला आहे.

Proceedings of tahsildar on billions of crores of rupees stored in river basin at Bhokardan | भोकरदन येथे नदीपात्रात साठवलेल्या करोडो रुपयाच्या वाळूसाठ्यावर तहसीलदारांची कारवाई

भोकरदन येथे नदीपात्रात साठवलेल्या करोडो रुपयाच्या वाळूसाठ्यावर तहसीलदारांची कारवाई

googlenewsNext

जालना : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे अवैध वाळू उपसा करणा-यांवर महसूल विभागाने दुपारी कारवाई केली. पूर्णा व गिरजा नदी पाञात करण्यात आलेल्या या कारवाईत करोडो रुपयाचा अवैध वाळूसाठा आढळून आला आहे.

भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाळूमाफियांनी थैमान घातले आहे. महसूल विभागाच्या त्यांच्या विरोधात कायम कारवाई सुद्धा होत असतात. यावेळी केदारखेडा परीसरातील पुर्णा व गिरजा नदी पाञात अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत होता. याची माहिती मिळताच भोकरदनच्या तहसिलदार योगीता कोल्हे यांच्या पथकाने आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान येथे धाड टाकली. यावेळी नदी पाञात हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत असल्याचे आढळून आले. पात्रामध्ये विविध ठिकाणी उपसा केलेल्या या वाळूचे मोठे ढीग दिसून येत होते. या साठ्यांच्या पंचनामा करणे सुरु असून याची किंमत करोडोच्या घरात आहे. महसूल विभागाच्या या धडकेबाज कारवाईमुळे वाळु माफीयांचे धाबे दणाणले आहेत. 

Web Title: Proceedings of tahsildar on billions of crores of rupees stored in river basin at Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.