भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:33 PM2019-01-28T18:33:25+5:302019-01-28T18:40:17+5:30

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No one will be helpless to the coalition, Chief Minister' devendra fadanvis warn to Shivsena | भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

Next

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात महत्त्वूपर्ण विधान केलं आहे. युतीसाठी कोणापुढेही लाचार नाही. जे हिंदुत्व मानतात ते सोबतच येतीलच. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच युतीची काळजी करू नका, असे म्हणत एकप्रकारे युतीसाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे सांगितलंय.

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केला. ढोबळे हे सोलापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचं समजतं. येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तर भाजपा-सेना युतीबाबतही आपली भूमिका मांडली. शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दुर ठेवता येणार आहे. युतीसाठी आम्ही पुर्वीपासूनच सकारत्मक आहोत. परंतु, युती न झाल्यासही आमची स्वबळावर  लढण्याची तयारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 60 वर्षांमध्ये जेवढे खड्डे खोदले आहे. ते भरण्याचे काम आम्ही पाच वर्षात केले. आणि पुढे ही करणार आहोत. 2008 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने केवळ 6 हजार कोंटीची कर्जमाफी दिली होती. परंतु, ती नेमकी कोणत्या शेतकºयांना मिळाली. याच्या याद्या त्यांनी सादर कराव्यात. असे आवाहन करुन आम्ही दिलेली कर्जमाफी 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. आणि त्याचा तंतोत हिशोब आमच्याकडे आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढून दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना यशस्वी झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच मोदींच्या कामकाजाचे कौतुक करताना महागठबंधन आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. विरोधकांनी आजपर्यंत जेवढं काम केलं, तेवढं काम मोदींना चार वर्षांत केलंय. देशात, सध्या विरोधकांचे धोरण फक्त मोदी हटाव असंच आहे. मोदींनी दिल्लीतील दलालांचं राज्य संपुष्टात आणले, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, नुकताच पालिका निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपाचा विजय झाल्याचं सांगताना, जनतेच्या मनात भाजपाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निवडणुकीआधी विरोधकांना नेता निवडता येत नाही. 




 

Web Title: No one will be helpless to the coalition, Chief Minister' devendra fadanvis warn to Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.