पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:01 IST2018-12-23T01:00:57+5:302018-12-23T01:01:09+5:30

अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी सय्यद याने एका शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढली.

Minor girl molested by police | पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी सय्यद याने एका शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भररस्त्यावर घडलेल्या या प्रकाराचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अंबड शहरातील गुढेनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा सय्यदने १५ दिवसांपूर्वी हात पकडण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर गुरुवारी पेठ गल्ली येथील मारुती मंदिराजवळ या मुलीला मोबाईल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Minor girl molested by police