इंदेवाडी शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST2018-06-03T00:59:01+5:302018-06-03T00:59:01+5:30

इंदेवाडी शिवारात जिल्हा कारागृहाला लागून असलेल्या विहिरीत शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास महिलेचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

The body of the woman was found in Indewadi Shivar | इंदेवाडी शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

इंदेवाडी शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

जालना : तालुक्यातील इंदेवाडी शिवारात जिल्हा कारागृहाला लागून असलेल्या विहिरीत शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास महिलेचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इंदेवाडी येथील प्रदीप शिंदे यांना सकाळी शेतातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ तालुका जालना पोलिसांना कळविले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. काही दिवसांपूर्वी तालुका जालना पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी सदर महिलेच्या नातेवाइकांना बोलावले असता, त्यांनी हा मृतदेह पार्वताबाई कुंडलिक पोकळे (रा. योगेशनगर) यांचा असल्याचे सांगितले. पोलीस नाईक मुसळे अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: The body of the woman was found in Indewadi Shivar