जालन्यात ९१ बनावट नोटा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 03:39 IST2018-03-02T03:39:16+5:302018-03-02T03:39:16+5:30

शहरातील शेख हमीद शेख युसुफ याच्याकडून ५०० रुपयांच्या ९१ बनावट नोटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या.

9 1 fake currency notes in Jalna | जालन्यात ९१ बनावट नोटा हस्तगत

जालन्यात ९१ बनावट नोटा हस्तगत

जालना : शहरातील शेख हमीद शेख युसुफ याच्याकडून ५०० रुपयांच्या ९१ बनावट नोटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या. याप्रकरणी शेखसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. पेन्शनपुरा भागातील शेख युसूफ बनावट नोटा जालन्यात चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून शेखकडून ७ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. मोहन श्रीकिशन जैस्वाल याला ५०० रुपयांच्या आणखी ८४ बनावट नोटा २० हजार रुपयांमध्ये दिल्याचे शेख याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर मोहनलाही ताब्यात त्याच्याकडून उर्वरित नोटा हस्तगत करण्यात आल्या.

Web Title: 9 1 fake currency notes in Jalna

टॅग्स :MONEYपैसा